
उरुळी कांचन : पोलिसांचा खबरी असल्याचा संशय घेत एका तरुणाला टोळक्याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना म्हातोबाची आळंदी येथे बुधवारी (ता. ७) रात्री आठ च्या सुमारास घडली. तसेच टोळक्याने वाहनांची लोखंडी शस्त्रांनी तोडफोड करत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केलायाबाबत रोहित सुभाष जावळकर (वय ३२, रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.