Otur Crime : ओतूर येथे देशी दारू दुकानात कामगाराला मारहाण प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

Liquor Shop Attack : ओतूर येथील देशी दारूच्या दुकानात पैशाच्या वादातून झालेल्या भांडणानंतर जमावाने दुकानातील कर्मचाऱ्यावर हल्ला केला. या प्रकरणी दोन महिलांसह सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Otur Crime
Otur Crime Sakal
Updated on

ओतूर : ओतूर ता.जुन्नर येथे सरकार मान्य देशी दारूच्या दुकानात दारूच्या बाटल्या खरेदी करताना पैस्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बेकायदेशीर जमाव जमवून, दारूच्या दुकानातील कामगाराला बेदम मारहाण प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी. थाटे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com