

मोबाईल न दिल्याने पेनूरमध्ये
शालेय विद्यार्थ्याची आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. ३ : मोबाईल वापरावयास का दिला नाही, म्हणून एका १३ वर्षाच्या शालेय विद्यार्थ्याने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. १) सायंकाळी सातपूर्वी पेनूर (ता. मोहोळ) येथे घडली. यशराज धर्मराज डोके असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
या संदर्भात मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेनूर येथील धर्मराज डोके हे कुटुंबासमवेत टेकळे वस्ती (पेनूर) येथे राहात असून, ते शेती करून उपजीविका करतात. १ मार्च रोजी सायंकाळी सातपूर्वी राहत्या घरी यशराजने मोबाईल वापरण्यास का दिला नाही या रागातून राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी यशराज घराची कडी का उघडत नाही म्हणून कुटुंबीयांनी लोखंडी रॉड घालून दरवाजाची कडी तोडली, त्यावेळी यशराज हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला तत्काळ पेनूर येथील खासगी रुग्णालयात व त्यानंतर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी आबा दत्तात्रय डोके यांनी मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली असून, अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल नाळे हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.