पुस्तकप्रेमींनो, रिक्षातून प्रवास करतानाही करा वाचन, तेही मोफत!

Mobile Library In Auto Rickshaw at pune named as kusumagraj
Mobile Library In Auto Rickshaw at pune named as kusumagraj

पुणे : आज काल मोबाईल, लॅपटॉप, टिव्हीचा वापर वाढत आहे. या तंत्रज्ञानाच्या आपण इतके अधीन झालो आहोत की, रिकाम्या वेळेत, बस, रिक्षामध्ये प्रवास करताना आपण सतत्त फक्त मोबाईलवरच असतो. मनोरंजन म्हणून वाचनाला आपण कधी प्राधान्यच देत नाही. वाचनापासून दूर जाणऱ्या आजच्या पिढीला प्रेरना देण्यासाठी पुण्यातील पुस्तकप्रेमींनी भन्नाट शक्कल लढवली आहे. चक्क रिक्षामध्ये वाचनालय सुरु करुन वाचनाला प्रोत्साहन देण्यास सुरवात केली आहे. रिक्षामध्ये सुरु केलेल्या या फिरत्या वाचनालयाला कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले आहे. 

मराठी भाषादिनी या वाचनालयाची सुरवात झाली आहे. यासाठी महाविद्यालयीन युवकांनी पुढाकार घेतला आहे. पुणे शहरात वाचन चळवळ वृद्धींगत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुक्त ग्रंथालयाचे (ओपन लायब्ररी) रूपांतर आता मोफत फिरते वाचनालयात करण्यात आले आहे. बालभारतीचे संचालक दिनकर पाटील आणि किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्या हस्ते या वाचनालयाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी लेखक शरद तांदळे, नाटककार प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते.

ओपन लायब्ररी मूव्हमेंट
राज्यात प्रियांका चौधरी यांनी पहिल्यांदा ओपन लायब्ररी मूव्हमेंट (मुक्त ग्रंथालय चळवळ) सुरू केली होती. या वाचन चळवळीच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत राज्यभरात शहरी व ग्रामीण भागात मिळून ४८ स्थायी वाचनालय सुरू केली आहेत. या सर्व वाचनालयाच्या माध्यमातून ४५ हजार पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. यामुळे रद्दीत जाणाऱ्या पुस्तकांना पुनर्जीवन मिळाले आहे. 

पुण्यात सुरु केले फिरते वाचनालय
सर्वसामान्य लोकांपर्यंत वाचनाची चळवळ पोचावी, या उद्देशाने पुणे शहरात या मोफत फिरते वाचनालयाची संकल्पना सुरू करण्यात आली आहे. यासाठी महाविद्यालयीन युवती प्रियांका चौधरी आणि युवक अभिषेक अवचार यांनी पुढाकार घेतला आहे. यामुळे नागरिकांना प्रवासातसुद्धा मोफत पुस्तके वाचायला मिळू शकणार आहेत. शिवाय वाचकांना त्यांच्या आवडीची पुस्तके घरी नेऊनही वाचता येणार आहेत. ही पुस्तके पूर्णपणे मोफत असतील, असे या वाचन चळवळीसाठी पुढाकार घेणाऱ्या प्रियांका चौधरी यांनी सांगितले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com