मोबाइलचा अतिवापर टाळणे हिताचे

मोबाइलचा अतिवापर टाळणे हिताचे

Published on

सुपे, ता. ८ ः मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होऊन, एकाग्रता कमी होत चालली आहे ही गंभीर बाब आहे. यासाठी मोबाइलचा वापर मर्यादित आणि आवश्यक गोष्टींसाठी केला पाहिजे, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या बारामती केंद्राच्या प्रमुख मंजूषादीदी यांनी सुपे (ता. बारामती) येथे केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या येथील श्री शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व विद्या प्रतिष्ठानच्या सुपे इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांना मोबाईल वापराचे दुष्परिणाम या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कुंडीतील वडाच्या रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
अभ्यासात मन एकाग्र व्हावे, चांगली झोप मिळावी, यासाठी मोबाईल कसा, किती वेळ वापरावा याविषयीच्या टिप्स विद्यार्थ्यांना दिल्या.
आठवड्यातून एक दिवस नो-मोबाईल असा उपवास करावा. अभ्यास व झोपण्याची खोली, जेवण करताना असे नो-मोबाईल झोन ठरवा. मोबाइलचा अतिवापर टाळण्यासाठी खेळ, वाचन, चित्रकला, बागकाम, भजन अशा गोष्टी करता येतील. सकाळी लवकर उठणे व रात्री लवकर झोपण्याचे फायदे त्यांनी सांगितले. शिक्षक व माता-पित्यांचा आदर केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी ध्यानाचे महत्त्व सांगून काहीवेळ विद्यार्थ्यांसह ध्यान केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. योगेश पाटील, प्राचार्य एस. ए. लोणकर, संतोष कोंडे, रत्ना गालिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com