

पुणे, ता. १७ : नवले पुलाजवळ प्रवाशाचा मोबाइल हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून मोबाइल, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अभय गणपत येवले (वय २६, रा. त्रिमूर्ती काॅलनी, काळेपडळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे आठ ऑगस्टला वाईला जाण्यासाठी निघाले होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावरील नवले पुलाजवळ असलेल्या थांब्यावर ते थांबले होते. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्याने त्यांच्याकडील मोबाइल हिसकावून नेला. तपासादरम्यान पसार झालेला चोरटा शिवतेजनगर परिसरात थांबल्याची माहिती तपासपथकातील सतीश मोरे आणि तानाजी सागर यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडून चोरलेला मोबाइल आणि दुचाकी असा ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक समीर गायकवाड, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, उत्तम तारु, अण्णा केकाण, विकास बांदल, राहुल ओलेकर, सागर शेडगे, विनायक मोहिते आणि समीर माळवदकर यांनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.