वाठार स्टेशन: आसनगाव येथे मोबाईल व टरबुज चोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

वाठार स्टेशन: आसनगाव येथे मोबाईल व टरबुज चोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Published on

आसनगावमध्ये मोबाईल, टरबूज चोरटा ताब्यात

वाठार स्टेशन, ता. ४ : आसनगाव (ता. कोरेगाव) येथील शेतातून मोबाईल व टरबूज चोरी झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी वाठार पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम संजय धुमाळ (वय २६, रा. निरगुडवाडी, ता. बारामती) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत श्रीकांत हणमंत चव्हाण (वय ४८, रा. आसनगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आसनगाव येथील नंबर नावच्या शिवारातील टरबूज पिकास पाणी देण्यासाठी गेले असता बांधावर ठेवलेला त्यांचा काळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल किंमत अंदाजे १९ हजार रुपये तसेच ३५ टरबूज (किंमत अंदाजे १२०० रुपये) असा एकूण २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. तर गणेश मारुती शिंदे (वय ४६, रा. आसनगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास इनाम नावाच्या शिवारातील गोठ्यातील कट्ट्यावर लाइट लावून ठेवलेला अंदाजे १७ हजार रुपयांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी वाठार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शुभम धुमाळ यास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस हवालदार भोसले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com