पुण्यात प्रवाशांना लुटणाऱ्या 'बचक्‍या टोळी'वर अखेर 'मोका' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पुण्यात प्रवाशांना लुटणाऱ्या 'बचक्‍या टोळी'वर अखेर 'मोका'

पुणे : शिवाजीनगर, पुणे स्टेशन व स्वारगेट येथील बसस्थानके, रेल्वे स्थानकांच्या परिसरातून शहरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करून त्यांना लुटण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या घटनांवर वचक बसविण्यासाठी पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांची लुटमार करणाऱ्या बचक्‍या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

अल्ताफ उर्फ बचक्‍या इक्‍बाल पठाण , सागर उर्फ पार्थ ज्ञानेश्वर भांडे , मोहरम उर्फ सम्या शफी शेख, शहाबाज उर्फ डी शरीफ नदाफ, राजेश मंगल मंडल उर्फ चौपाट्या, इमाम जलालउद्दीन सय्यद, महादेव उर्फ महादेव गौतम थोरात, अलिशान उर्फ अली रफिक शेख, जय उर्फ नन्या उर्फ विलास तुपे अशी "मोका' अंतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत. शहरात मागील काही दिवसांपासून प्रवाशांना लुटण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याची सद्यस्थिती आहे.

हेही वाचा: 'आर्मी मॅन'मुळे टोकियोत वाजली 'जन-गण-मन'ची धून; नीरजला गोल्ड

23 जून रोजी पहाटे चार ते साडेचार वाजण्याच्या आरोपींनी एका व्यक्तीला वाघोली येथे घेऊन जाण्याच्या बहाण्याने रिक्षात बसविले, त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार करून त्यास लाथाबुक्‍यांनी जबर मारहाण करीत लुटले होते. या गुन्ह्यातील आरोपी बचक्‍या व त्याच्या साथीदारांचा शोध घेत त्यांना अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असतानाच संबंधित गुन्हा हा आरोपी बचक्‍याने त्याच्या साथीदारांना संघटीत करून केल्याचे निष्पन्न झाले. तसेच स्टेशन परिसरात आपली दहशत निर्माण व्हावी, वर्चस्व कायम टिकावे यासाठी प्रवाशांना लुटणे, मारहाण करणे असे विविध प्रकारचे गंभीर गुन्हे त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत केल्याचे समोर आले.

हेही वाचा: 'आर्मी मॅन'मुळे टोकियोत वाजली 'जन-गण-मन'ची धून; नीरजला गोल्ड

टोळीचे गुन्हेगारी कृत्य गंभीर असल्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्फत अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांना मोकाअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची पडताळणी केली असता सर्व आरोपी हे बचक्‍याच्या टोळीतील सदस्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार डॉ. शिंदे यांनी मोका कलमानुसार,त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत सांगळे करीत आहेत.

Web Title: Mocca Action On Bachkya Gang Robbing Passengers In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :pune