दौंड - मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करून राज्य राखीव पोलिस दलात प्रविष्ठ झालेल्या अंमलदारांनी सायबर गुन्हे अन्वेषण व अन्य प्रशिक्षण घेत स्वत: ला ज्ञान - तंत्रज्ञानाविषयी अद्ययावत ठेवावे. संकटे अनेक आहेत परंतु सेवाकाळातील निरंतर प्रशिक्षणाद्वारे त्यावर मात करीत राष्ट्रसेवेसाठी सदैव सज्ज राहावे, असे आवाहन राज्य राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.