Vidhan Sabha 2019 : पुण्यात भाजपला प्रचारासाठी हवेत मोदी आणि शहा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

विधानसभा 2019  
पुणे -  शहरातील आठही विधानसभा मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिलेला असला, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी, प्रवक्ते संबीत पात्रा यांच्यासह अनेक बड्या स्टार प्रचारकांच्या सभा आणि मेळावे घेण्यासाठी शहर भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत.

विधानसभा 2019  
पुणे -  शहरातील आठही विधानसभा मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिलेला असला, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी, प्रवक्ते संबीत पात्रा यांच्यासह अनेक बड्या स्टार प्रचारकांच्या सभा आणि मेळावे घेण्यासाठी शहर भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पंतप्रधान मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा, राजनाथसिंह, शिवराजसिंह चव्हाण, योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील आदी नेत्यांचा समावेश आहे.

प्रत्येक मतदारसंघातील मतदारांचा कौल बघून व ते कोणत्या विचाराने प्रभावित होतात, याचा विचार करून भाजपकडून प्रचाराची व स्टार प्रचारकांच्या दौऱ्याची आखणी केली जात आहे. पुण्यात महाराष्ट्रातून विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्रातून स्थलांतरित झालेला व मतदार झालेला वर्ग आहे. त्यादृष्टीनेही भाजपकडून त्या भागातील नेत्यांच्या सभा घेतल्या जाणार आहेत. तसेच व्यापारी, राजस्थानी, उत्तर भारतातील मतदारांसाठी दिल्लीतील नेत्यांचे मेळावे घेतले जाणार आहेत.

शहर भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह राजस्थान, गुजरात येथील नेत्यांची, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याही सभांची मागणी केली आहे. त्याचे वेळापत्रक अद्याप आलेले नाही. मोदी यांची पुणे व जिल्ह्यासाठी एक सभा घेण्याचा प्रयत्न आहे.
- माधुरी मिसाळ, शहराध्यक्षा, भाजप

बीडला अमित शहांच्या उपस्थितीत दसरा मेळावा
संत भगवानबाबा यांचे जन्मगाव असलेल्या बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे ८ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या ‘दसरा मेळाव्या’ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. पुण्यात राहणाऱ्या भगवानबाबांच्या भक्तांनी मेळाव्याला हजर राहावे, असे आवाहन भाजपच्या शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत केले. या वेळी दसरा मेळावा कृती समिती पुणेचे सदाशिव खाडे, दत्ता खाडे, अशोक मुंडे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi and Shah campaign for BJP Demand for city BJP in Pune