असे नेले मोदींनी गांधीना काँग्रेसमधून भाजपमध्ये! गंमत पाहा (व्हिडिओ)

टीम ई-सकाळ
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओला काहींनी कॅप्शनही मजेशीर दिले आहेत.

पुणे : सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओला काहींनी कॅप्शनही मजेशीर दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वेषात असलेल्या दोन व्यक्तींचा हा व्हिडिओ आहे. यामधील एक महात्मा गांधी सारखी दिसणारी व्यक्ती सुरवातीला पुढे चालताना दिसत असून त्या व्यक्तीला पंतप्रधान मोदीसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने समोर येऊन रस्ता दाखवल्याचे दिसत आहे. 

सध्या काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये पक्षांतर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी महात्मा गांधीना काँग्रेसमधून भाजपमध्ये नेले अशा आशयाचे कॅप्शन देत नेटीझन्स हा व्हिडिओ व्हायरल करत आहेत. सोशल मीडियावर पक्षांतराच्या चर्चा होत असताना आणि मीम्स व्हायरल होत असताना हा व्हिडिओ अत्यंत मजेशीर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi has taken Gandhi from the Congress to the BJP Viral Video