मोडनिंब येथील शिक्षकाच्या घराचा दरवाजा भर दिवसा तोडून अडीच लाख रूपयांच्या ऐवजावर मारला डल्ला

मोडनिंब येथील शिक्षकाच्या घराचा दरवाजा भर दिवसा तोडून अडीच लाख रूपयांच्या ऐवजावर मारला डल्ला
Published on: 

TMB26B04217
टेंभुर्णी (ता. माढा) : शिक्षक अन्वरहुसेन मुलाणी यांच्या घरातील कपाट फोडून चोरी करताना चोरट्याने अस्ताव्यस्त केलेले सामान.
---
मोडनिंबमध्ये दिवसा घरफोडी;
२.४३ लाखांचा ऐवज लंपास
शिक्षक उपचाराला गेल्याची साधली संधी
सकाळ वृत्तसेवा
टेंभुर्णी, ता. ५ : मोडनिंब येथील शिक्षकाच्या घराचा मागील दरवाजा व कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा घरात प्रवेश केला. कपाटातील दोन लाख रुपये रोख, चांदीचे दागिने व घड्याळ असा एकूण दोन लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. रविवारी दुपारी दोन ते पाचच्या दरम्यान ही घटना घडली. शिक्षक रुग्णालयात उपचारासाठी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घर फोडल्याने मोडनिंब शहरात खळबळ उडाली आहे.
मोडनिंब येथील शिक्षक अन्वरहुसेन बापूसाहेब मुलाणी (वय ५१) हे पत्नी, मुलगा व मुलीसह राहतात. रविवारी पत्नी व मुले बाहेरगावी गेली होती. त्यामुळे दुपारी दोनच्या सुमारास घराला कुलूप लावून मुलाणी उपचारासाठी मोडनिंब येथील सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये गेले होते. उपचार करून सायंकाळी पाचच्या सुमारास ते घरी परतले. घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर दरवाजा व कडी-कोयंडा तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. कपाट उघडे असल्याचे दिसल्यानंतर पाहणी केली असता लॉकरमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये रोख, चांदीचे दागिने व ३५ हजार रुपये किमतीचे टायटन कंपनीचे घड्याळ चोरीला गेल्याचे आढळले.
या प्रकरणी मुलाणी यांनी सोमवारी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक रोहित पवार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com