

मोडनिंबमध्ये जलजीवनची कामे कुर्मगतीने
कामे तातडीने पूर्ण करा; जिल्हा परिषद सदस्याची मागणी
मोडनिंब, ता. २८ ः येथील सुरू असलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केल्याचे जिल्हा परिषद सदस्य वंदना कांबळे यांनी सांगितले. सध्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. येवती तलावात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही पाणीपुरवठा करणारी पूर्वीची व्यवस्था अपुरी पडत आहे. मागील तीन वर्षांपासून मोडनिंब येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. अनेक अडथळ्यांचा सामना करीत हे काम कुर्म गतीने सुरू आहे. स्थानिक अडथळ्यासोबतच शासनाकडून होणारा योजनेसाठीचा वित्त पुरवठाही कळीचा मुद्दा ठरला आहे.
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या महत्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण करण्याची मागणी वंदना कांबळे यांनी केली. यामध्ये जलशुद्धीकरण केंद्रातून मुख्य संतुलन टाकीपर्यंत जोडणी पूर्ण करावी. नवीन जलवाहिनीची येवती ते जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान दोन ठिकाणी अपूर्ण असलेली कामे पूर्ण करावीत. ही कामे तातडीने पूर्ण झाल्यास ग्रामस्थांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.