Loni Kalbhor Moharram : लोणी काळभोरमध्ये मोहरम उत्सवात ‘या हुसेन’च्या जयघोषात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश

लोणी काळभोरमध्ये पारंपरिक ताबूत मिरवणूक, ‘या हुसेन’च्या घोषात सरबत व प्रसाद वाटपातून हिंदू-मुस्लिम ऐक्य, धार्मिक सलोखा आणि मानवतेचा संदेश उजळला
Moharram festival celebrated with religious harmony in Loni Kalbhor

Moharram festival celebrated with religious harmony in Loni Kalbhor

Sakal

Updated on

लोणी काळभोर : लोणी काळभोर येथे शुक्रवारी (ता. २६) मोहरम उत्सव अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. ‘या हुसेन... या हुसेन...’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक ताबूत मिरवणूक, सवाऱ्यांचा थरार, पंजा भेटीचा भावनिक सोहळा तसेच सरबत व प्रसाद वाटपातून धार्मिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रेरणादायी दर्शन घडले.कुराण पठणानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास वाद्यांच्या गजरात ताबूताची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी भाविकांसाठी मुस्लिम जमातीतर्फे सरबताचे वाटप करण्यात आले. लोणी काळभोर पोलिस ठाण्यासमोर ताबूत आल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार पवार यांनी दर्शन घेऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. हसन आणि हुसेन यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा होणारा मोहरम हा त्याग, श्रद्धा आणि मानवतेचा संदेश देणारा सण असल्याची भावना यावेळी मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

Students were educated about the POCSO Act, safe social media use, emergency helpline numbers and cybercrime prevention.
Police reached the spot in time, brought the situation under control and registered a case for disturbing public peace.
The crackdown is part of a sustained campaign to curb drug abuse and illegal narcotics activities in the Pune rural region.
Loni Kalbhor Police launched a special enforcement drive against illegal roadside parking on the Pune–Solapur National Highway and booked three drivers for obstructing traffic.
Marathi News Esakal
www.esakal.com