माळशिरस तालुका.... वार्तापत्र.. सुनील राऊत

माळशिरस तालुका.... वार्तापत्र.. सुनील राऊत
Published on

लोगो : माळशिरस तालुका
---
आ.उत्तमराव जानकर, माजी आमदार राम सातपुते, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे फोटो वापरावेत.
---
यंदाची जि.प. निवडणूक नेत्यांच्या प्रतिष्ठेची
मोहिते-पाटील विरुद्ध मोहिते-पाटील विरोधक या पारंपरिक लढतीला छेद
सुनील राऊत : सकाळ वृत्तसेवा
नातेपुते, ता. ३ : माळशिरस तालुक्याच्या राजकारणात वर्षानुवर्षे मोहिते-पाटील समर्थक आणि मोहिते-पाटील विरोधक अशीच स्पष्ट विभागणी राहिली आहे. कोणतेही चिन्ह असो, निवडणूक ही प्रत्यक्षात वैयक्तिक राजकीय लढत ठरत आली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून या परंपरागत समीकरणांना धक्का बसला आहे. कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाणारी जिल्हा परिषद निवडणूक यंदा मात्र नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई ठरत आहे. मोहिते- पाटील, जानकर आणि सातपुते कुटुंबातील सदस्य थेट रिंगणात उतरल्याने ही लढत अधिकच रंगली आहे.
मोहिते-पाटील परिवाराचे पारंपरिक विरोधक आमदार उत्तमराव जानकर आणि मोहिते-पाटील यांची युती झाल्याने तालुक्यातील राजकारणाची दिशा बदलली. या अनपेक्षित घडामोडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र, भाजपने तत्कालीन आमदार राम सातपुते यांना दिलेल्या ताकदीमुळे चित्र हळूहळू स्पष्ट होत गेले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले भाजपचे माजी आमदार राम सातपुते हे स्वतंत्र विचारसरणीचे नेते म्हणून पुढे आले. ही भूमिका मोहिते-पाटील परिवाराला स्वीकारार्ह ठरली नाही. परिणामी, मोहिते-पाटलांनी उत्तमराव जानकर यांना जवळ करत राम सातपुतेंविरोधात राजकीय आघाडी उभी केली. त्यानंतर तालुक्यातील सत्ता-समीकरणे पूर्णतः बदलली.
सध्याच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गट व अठरा पंचायत समिती गणांसाठी एकूण ८४ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी सर्वच्या सर्व २७ जागांवर भाजप कमळ चिन्हावर लढत आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकत्र येत भाजपविरोधात तोडीस तोड उमेदवार उभे केले आहेत.
---
चौकट
प्रतिष्ठेची थेट लढाई
पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर आणि माजी आमदार राम सातपुते यांच्या विरोधात मोहिते- पाटील परिवार व आमदार उत्तमराव जानकर यांची आघाडी उभी आहे. प्रत्यक्ष उमेदवारांपेक्षा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे. शेवटच्या टप्प्यात मतदारांचा कौल निर्णायक ठरणार असल्याची चर्चा आहे.
---
मतदार संख्या
पुरुष : १,६४,९५०
महिला : १,५३,३१५
इतर : १६
एकूण : ३,१८,२८१
---
तालुक्यातील लक्षवेधी लढती
- दहिगाव जि.प. गट : जीवन उत्तमराव जानकर विरुद्ध संस्कृती राम सातपुते.
- गुरसाळे गण : अर्जुनसिंह मोहिते-पाटील विरुद्ध भाजपचे दत्तात्रय शेळके.
- फोंडशिरस गट : अर्जुनसिंह मोहिते-पाटील विरुद्ध हरिदास वाघमोडे.
- वेळापूर गण : विमल उत्तमराव जानकर विरुद्ध अमृतराज सूर्यकांत माने-देशमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com