मोहोळ शहरात एक कॅमेरा पोलिसांसाठी उपक्रम, व्यापाऱ्यांना पोलीस निरीक्षक पोवार यांचे आवाहन

मोहोळ शहरात एक कॅमेरा पोलिसांसाठी उपक्रम, व्यापाऱ्यांना पोलीस निरीक्षक पोवार यांचे आवाहन

Published on

MOH26B03281
मोहोळ : व्यापाऱ्यांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करताना पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार व समोर बसलेले व्यापारी.
---
मोहोळ शहरात ‘एक कॅमेरा पोलिसांसाठी’ उपक्रम
व्यापाऱ्यांची पोलिसांसोबत बैठक; सुरक्षा, बाजार व्यवस्थापनावर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. २४ : शहर सुरक्षा व विविध उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी मंगळवारी (ता. २४) व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली. बैठकीत शहरातील दुकाने, वाहतूक अडथळे, ‘एक सीसीटीव्ही कॅमेरा पोलिसांसाठी’ उपक्रम, अपघातप्रवण रस्ते आणि भाजी मंडई व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मोहोळ शहरात लहान- मोठी मिळून सुमारे २५० ते ३०० दुकाने असून मोबाईल, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स, कापड, मोटारसायकल विक्री आदी मोठ्या व्यवसायांचा समावेश आहे. मात्र बहुतांश दुकानांपुढे सुरक्षेसाठी सीसीटीव्ही नसल्याने चोरीच्या घटनांचा तपास करताना अडचणी निर्माण होतात. यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी ‘एक सीसीटीव्ही कॅमेरा पोलिसांसाठी’ हा उपक्रम राबवत दुकानांसमोर कॅमेरे बसवावेत, असे आवाहन पोवार यांनी केले. यामुळे चोरीस आळा बसेल तसेच गुन्ह्यांचा तपास सुलभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुकानांसमोर लावण्यात येणाऱ्या स्टँड बोर्डमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. व्यापाऱ्यांनी फलक दुकानाच्या वर लावावेत; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
कुरुल रस्त्यावर वाढत्या अपघातांबाबत व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. या मार्गावरून जड वाहने मंद्रूपकडे जातात, तसेच दूध व्यावसायिक, विद्यार्थी व नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी करण्यात आली. यावर संबंधित विभागाला सूचना देण्याचे आश्वासन पोवार यांनी दिले.
बैठकीस नाना डोके, महेश लांडगे, धनंजय कारंजकर, हरिश्चंद्र बावकर, महादेव इंगळे, राजशेखर घोंगडे, चंदुलाल भिवरे, हरी गोटे, प्रसाद कोरे आदींसह अन्य व्यापारी उपस्थित होते.
---
चौकट
भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागेची मागणी
मुख्य रस्त्यावर सकाळी व सायंकाळी भरत असलेल्या भाजी मंडईबाबतही चर्चा झाली. ग्रामीण भागातील शेतकरी भाजी विक्रीसाठी येतात आणि शासकीय कर्मचारी परतीच्या वेळी खरेदी करतात. भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र व योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com