

MOH26B03604
मोहोळ ः तहसील कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करताना जनहित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी अन् शेतकरी.
थकीत अनुदानासाठी मोहोळमध्ये हलगीनाद आंदोलन
कृषी अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तूर्त स्थगित
मोहोळ, ता. १७ : शेतकऱ्यांच्या थकीत अनुदानासाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.
मोहोळ तालुक्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसह विविध कृषी योजनांचे प्रलंबित अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. फळबाग, ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, शेती अवजारे अन् इतर योजनांचे अनुदान अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नसल्याचा मुद्दा आंदोलकांनी उपस्थित केला.
आंदोलनादरम्यान शेतकरी अन् संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हलगीनाद करून शासनाचे लक्ष वेधले. पात्र लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून आर्थिक अडचण दूर करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली.
दरम्यान, कृषी अधिकारी निगडे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्याशी चर्चा केली. ट्रॅक्टर, शेती अवजारे अन् यंत्रणेसाठी १५ कोटी रुपये मंजूर असून, तीन ते चार दिवसांत मोहोळ तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल, असे सांगण्यात आले. तसेच फळबागेच्या थकीत अनुदानासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.