मोहोळ तालुक्यात "सिंगल डे सर्विस डिलिव्हरी'' शासनाचा उपक्रम

मोहोळ तालुक्यात "सिंगल डे सर्विस डिलिव्हरी'' शासनाचा उपक्रम

Published on

मोहोळ तालुक्यात सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी उपक्रमाचे आयोजन
तहसीलदार सचिन मुळीक यांची माहिती; मार्च ते मे दोन महिने असणार कार्यक्रम

सकाळ वृतसेवा
मोहोळ, ता. ३ ः मोहोळ तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाची विशेष मोहीम मार्चपासून सुरू होत आहे. राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत मार्च ते मे या कालावधीत तालुक्यातील विविध महसूल मंडलांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती तहतीलदार सचीन मुळीक यांनी दिली.
सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी संकल्पनेनुसार नागरिकांना एकाच दिवशी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तहसीलदार मुळीक यांनी मोहिमेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करत ग्रामीण भागातील प्रलंबित महसूल कामे जलदगतीने मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित असल्याने या शिबिरांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मोहोळ तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित महसूल मंडळाच्या ठिकाणी उपस्थित राहून या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मुळीक यांनी केले आहे.
या शिबिरांमुळे महसूल कामातील दिरंगाई कमी होऊन प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होणार आहे. या शिबिरांमध्ये सातबारा उताऱ्याचे वाचन, सामाजिक अर्थसाह्य योजनांचे अर्ज स्वीकारणे तसेच विद्याथ्यांसाठी शैक्षणिक दाखल्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्याबरोबर मंजूर फेरफार प्रकरणांतील सातबारा व खाते उताऱ्याचे वाटप करण्यात येणार आहे. सातबारा उताऱ्यातील त्रुटी विषयी अर्ज स्वीकारून त्यावर तात्काळ कार्यवाही केली जाणार असून, डिजिटल सातबारा संदर्भात जनजागृतीही केली जाणार आहे. भोगवटदार वर्ग-२ जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतर, तुकडेबंदी खरेदी-विक्री व्यवहारांचे नियमन, कायद्यांतर्गत (१९६५ ते २०२४) तसेच अकृषक तरतुदीं मधील सुधारणांबाबत मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचे तहसीलदार मुळीक यांनी सांगितले.

शिबीराची तारीख व महसुल मंडल
शनिवार ७ मार्च सावळेश्वर/पेनूर,
शनिवार १४ मार्च कामती बु॥,
शुक्रवार १० एप्रिल टाकळी सिकंदर,
शुक्रवार १७ एप्रिल वाघोली, शेटफळ नरखेड
शुक्रवार ८ मे मोहोळ
शुक्रवार १५ मे अनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com