Cloudy Weather Threatens Mango and Cashew Blossoms
Sakal
मोखाडा : खरीप हंगामानंतर शेतकरी आणि फळबागयतदारांना, आंबा आणि काजु च्या पिकांच्या आर्थिक आधाराची अपेक्षा असते. त्यासाठी फळबागयतदार त्यांची निगा राखत असतात. आता आंबा आणि काजु मोहोरले आहेत. मात्र, सातत्याने ढगाळ वातावरण होत असल्याने, मोहोर जळुन आणि अवकाळी पावसाच्या वातावरणाने गळून जाण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे फळबागयतदार चिंतेत पडले आहेत.