esakal | पुण्यात पोलिस मुख्यालयात खळबळ; विनयभंग, गोळीबार आणि आत्महत्येचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

molesting and firing at Shivajinagar police headquarters Pune

आरोपी असलेल्या पोलिस शिपायास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत गार्ड ड्युटीवर असलेला पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. मयूर सस्ते (वय 33) असे अटक आरोपीचे नाव आहे, तर भेंडाळे हा पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी भेंडाळे आणि तीस वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्याने तक्रार दिली आहे. सस्तेची ड्युटी बिगूल वादक म्हणून आहे. त्याच्या पत्नीने त्याच्याविरुध्द घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे.

पुण्यात पोलिस मुख्यालयात खळबळ; विनयभंग, गोळीबार आणि आत्महत्येचा प्रयत्न

sakal_logo
By
सनिल गाडेकर

पुणे : पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर येथील मुख्यालयात विनयभंगाच्या घटनेतून गोळीबाराचा प्रकार घडला. ही घटना मंगळवारी (ता.20) पहाटे घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात विनयभंग आणि आत्महत्येचा प्रयत्न व आर्म ऍक्‍टनूसार दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. 

आरोपी असलेल्या पोलिस शिपायास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत गार्ड ड्युटीवर असलेला पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. मयूर सस्ते (वय 33) असे अटक आरोपीचे नाव आहे, तर भेंडाळे हा पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी भेंडाळे आणि तीस वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्याने तक्रार दिली आहे. सस्तेची ड्युटी बिगूल वादक म्हणून आहे. त्याच्या पत्नीने त्याच्याविरुध्द घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पोलिस मुख्यालयात एका 30 वर्षीय पोलिस कर्मचारी रात्री गेटवर ड्युटीवर होती. तर आरोपी मयूर सस्ते हाही रात्रपाळीच्या डयुटीवर होता. पहाटे साडेचारच्या सुमारास तक्रारदार महिलेचा झोप लागल्याची संधी साधत सस्ते तेथे दाखल झाला. त्याने तक्रारदार महिलेचा विनयभंग केला. यामुळे घाबरुन गेलेल्या तक्रारदार महिलेने आरडा ओरडा केला. तिचा आवाज ऐकून गार्ड ड्युटीवर असलेला पोलिस कर्मचारी भेंडाळे हा तेथे दाखल झाला. महिलेने घडलेली घटना भेंडाळेला सांगितली.

भेंडाळेने सस्तेला समजावून सागण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलेने तक्रार केल्यास पुढील होणाऱ्या परिणामांचीही कल्पना दिली. यामुळे घाबरलेल्या सस्तेने भेंडाळे यांची रायफल अचानक खेचून खेत स्वत:च्या हनुवटीला लावली. सस्तेचा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भेंडाळे यांनी रायफर खेचण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत रायफलमधून फायरिंग झाले. सुदैवाने रायफलमधील गोळी भेंडाळे यांच्या हाताला चाटून गेली. यानंतर इतर जमलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सस्तेला शांत करत बसवून ठेवले. दरम्यान ही घटना तातडीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सांगण्यात आली. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी येऊन सस्तेला ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलिस उपायुक्त (मुख्यालय) स्वप्ना गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलिस निरीक्षक मनिषा झेंडे दाखल झाले होते.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मुख्यालय ठरतेय वादग्रस्त : 
पोलिस मुख्यालयाच्या आवारातील ही मागील काही महिन्यातील तीसरी घटना आहे. या घटनेअगोदरच दोन महिला कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली होती. ड्युटी महिला ऑफिसर आणि पोलिस कर्मचारी असलेल्या महिलेची ड्युटी लावण्यावरुन भांडणे झाली होती. याचे पर्यवसन मारामारीत झाले होते. तसेच त्याअगोदरही दोन पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली होती. मुख्यालयाच्या आवारातील सायबर पोलिस ठाण्यातही दोन कर्मचाऱ्यांची हाणामारी चर्चेचा विषय झाली होती. पोलिस ठाण्यात वादग्रस्त ठरलेल्या किंवा तक्रारी आलेल्या कर्मचाऱ्यांची बदली मुख्यालयात शिक्षा म्हणून केली जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image
go to top