Khadakwasala News : तो आला... पण धो-धो बरसलाच नाही!

खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा वाढीची प्रतीक्षा कायम.
Khadakwasala Weather

Khadakwasala Weather

sakal

Updated on

खडकवासला - खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी दुपारी काळे ढग दाटून आल्याने जोरदार पावसाची आशा निर्माण झाली होती. काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला, मात्र अपेक्षित मुसळधार पावसाऐवजी अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या हलक्या सरी कोसळून पावसाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात कोणतीही लक्षणीय वाढ झाली नाही. शेतकरी, नागरिक आणि जलसंपदा विभागाच्या नजरा आता दमदार पावसाकडे लागल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com