Monsoon Update : मॉन्सूनचा ‘अर्ली एंट्री’! पण मुसळधार पावसासाठी प्रतीक्षा
Pune Weather: राज्यात यंदा मान्सूनने विक्रमी लवकर आगमन केलं असूनही, पुण्यासह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही. विभागानुसार, पावसासाठी आवश्यक वातावरण अद्याप तयार झालं नाही.
पुणे : यंदा मॉन्सूनने सर्व विक्रम मोडले आहेत. राज्यात मॉन्सूनने वेळेआधीच म्हणजे १४ दिवस आधीच २५ मे रोजी प्रवेश केला. पुण्याला मेमध्ये पूर्वमोसमी आणि नंतर मोसमी पावसाने झोडपले.