
पुणे : राज्यात मॉन्सून सक्रिय झाला आहे. या प्रभावामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी (ता. १६) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. रविवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या रिपरिपमुळे कमाल तापमानात मोठी घट झाली. पुढील तीन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस कायम राहील, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.