
पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज विदर्भाच्या उर्वरित भागासह संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये असलेल्या दोन कमी दाब क्षेत्रांमुळे चाल मिळाल्याने तब्बल तीन आठवड्यांची विश्रांती घेतल्यानंतर मॉन्सूनने वेगाने प्रगती केली आहे.