
मुंढवा : मुंढवा मुळा-मुठा नदी पुलावर पालिकेने पावसाळ्यापूर्वी स्वच्छता केली नसल्यामुळे संततधार पडणाऱ्या पावसामुळे पाणीच पाणी झाले. पुलावर पाणी साचून रस्ता ओढ्याच्या स्वरूपात बदलला, त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन वाहन चालविणे चालकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. दुचाकी घसरून चालकांना किरकोळ अपघातास सामोरे जावे लागत आहे. स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुलावरील पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करून अपघात टाळावेत, अशी मागणी होत आहे.