
प्रज्वल रामटेके
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या आगमनानंतर सह्याद्रीच्या हिरव्या गर्द रांगांमध्ये निसर्गाचे स्वर्गीय रूप उतरले आहे. याच आकर्षणाने अनेक निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि तरुण मंडळी जिल्ह्याच्या विविध गड-किल्ल्यांवर, दऱ्या-खोऱ्यांत मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. मात्र, हे निसर्गसौंदर्य पाहताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने करण्यात आले.