esakal | मॉन्सून ट्रिप करताय? थांबा...
sakal

बोलून बातमी शोधा

मॉन्सून ट्रिप करताय? थांबा...

मॉन्सून ‘फुल ॲक्‍टिव्ह’ आहे. मस्त पाऊस पडतोय. ‘वीकेंड’ला पावसात भिजण्यासाठी जवळपासच्या घाटमाथ्यावर जाण्याचा ‘प्लॅन’ करताय?... पण, तो प्लॅन जरा ‘होल्ड’वर ठेवा...

मॉन्सून ट्रिप करताय? थांबा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे- मॉन्सून ‘फुल ॲक्‍टिव्ह’ आहे. मस्त पाऊस पडतोय. ‘वीकेंड’ला पावसात भिजण्यासाठी जवळपासच्या घाटमाथ्यावर जाण्याचा ‘प्लॅन’ करताय?... पण, तो प्लॅन जरा ‘होल्ड’वर ठेवा... कारण, पावसामुळे घाटमाथ्यावरील दरडी कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

पाऊस पडतोय म्हटले, की आपण पुणेकर पहिल्यांदा आपल्या गाड्या वळवतो ते सिंहगडाकडे. मस्त ढगांत हरवलेल्या सिंहगडावरील गरम-गरम भजी, पिठलं-भाकरी याची मजा गेल्या काही ‘वीकेंड’मध्ये आपण घेतली. आता मॉन्सून ऐन बहरात आहे. पावसाच्या एकामागून एक सरी कोसळत आहेत. या पावसात मनसोक्त भिजण्यासाठी ‘वीकेंड’ला जवळच लोणावळा, खंडाळा, माथेरान, माळशेज, ताम्हिणी येथे जाण्याचा ‘प्लॅन’ बहुतांश जण करतात. या रविवारी (ता. १४) क्रिकेटच्या ‘वर्ल्ड कप’ची ‘फायनल’ आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री जाऊन शनिवारी परत घरी येण्याच्या दृष्टीने ‘प्लॅनिंग’ सुरू झाले असेल; पण या दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या दरड कोसळण्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यामुळे तुमचा हा ‘प्लॅन’ थोडा लांबणीवर टाका. 

पुढील तीन दिवस धोक्‍याचे
हवामान खात्याबरोबरच ‘सतर्क’ या संस्थेनेही पुणे, सातारा, मुंबई, नाशिक, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. पुढील तीन दिवसांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना या भागात घडू शकतात, असा इशारा या दोन्ही संस्थांनी दिला आहे.

loading image
go to top