

श्रावणामुळे फळभाज्यांना मागणी; आवक वाढूनही दर टिकून
पावसाची उघडीप; पालेभाज्यांची आवक वाढली, फळांचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढले
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.१६) फळभाज्यांची आवक वाढली होती. तर श्रावण महिन्यामुळे सर्व प्रकारच्या फळभाज्यांना मागणी वाढल्याने सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने टिकून होते.
विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ५ टेम्पो, हिमाचल प्रदेश व कर्नाटकातून घेवडा ४ टेम्पो, गुजरात आणि कर्नाटकातून भुईमूग शेंग ४ टेम्पो, इंदूर येथून गाजर १० टेम्पो, कर्नाटक येथून पावटा ३ टेम्पो, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून शेवगा ४ टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे १० टेम्पो, इंदूर, आग्रा येथून बटाटा ४० टेम्पो आवक झाली होती.
तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ४५० गोणी, भेंडी ६ टेम्पो, गवार हिरवी, कोबी, मिरची प्रत्येकी ५ टेम्पो, टोमॅटो १५ हजार क्रेट्स, काकडी ७ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, गाजर ३ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, मटार, घेवडा प्रत्येकी सुमारे ३ टेम्पो, ३, पावटा, शेवगा प्रत्येकी सुमारे २ टेम्पो, कांदा सुमारे १०० टेम्पो आवक झाली होती.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : २८०-३५०, बटाटा : ८०-१४०, लसूण : ७००-२१००, आले (सातारी) : ७००-१४००, भेंडी : २००-३५०, गवार : ५००-७००, टोमॅटो : १००-१८०, दोडका : ३५०-४५०, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : १५०-२५०, चवळी : २००-२५०, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी २५०-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : ३५०-४००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : २००-२५०, कोबी : १००-१५०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : ३५०-४००, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी : ४००-५००, जाड : २००-२५०, शेवगा : ३५०-५००, गाजर : २००-२५०, वालवर : ३५०-४००, बीट : १८०-२२०, घेवडा : ५००-६००, कोहळा : १००-१५०, आरवी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ५००-७००, मटार : ८००-९००, पावटा : ३००-४००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : ५००-७००, सुरण : १८०-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
--
पालेभाज्या
बहुतांश पालेभाज्यांचे भाव स्थिर
पावसाने उघडीप दिल्याने पालेभाज्यांचा दर्जा सुधारला आहे. रविवारी मार्केटयार्ड घाऊक बाजारात पालेभाज्यांची आवक आणि मागणी वाढली होती. परिणामी, सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने टिकून होते. आवकेमध्ये कोथिंबिरीच्या २ लाख २५ हजार जुड्या, तर मेथीच्या ७० ते ८० हजार जुडी आवक झाली होती.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव :
कोथिंबीर : ४००-१०००, मेथी : ५००-१०००, शेपू : ५००-१०००, कांदापात : १०००-१५००, चाकवत : ५००-१०००, करडई : ४००-८००, पुदिना : १०००-२०००, अंबाडी : ४००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५००-८००, चुका : ५००-१०००, चवळई : ४००-८००, पालक : १५००-२०००.
---
फळबाजार
लिंबू, पपई, सीताफळ भावात वाढ
फळबाजारात पावसामुळे सर्वप्रकारच्या फळांची आवक वाढली होती. श्रावण महिन्यामुळे फळांना मागणी वाढल्याने बहुतांश फळांचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढले होते. विविध फळांच्या आवकेत लिंबू सुमारे १ हजार गोणी, मोसंबी ५० टन, संत्रा ५ टन, डाळिंब सुमारे १५० टन, पपई १० टेम्पो, कलिंगड ८ गाड्या, खरबूज २ टेम्पो, चिकू सुमारे १ हजार डाग, पेरू ५०० क्रेट, पिअर ५ गाड्या, सीताफळ ३ टन आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ४०० ते १२००, मोसंबी : (३ डझन) : ११०-२६० (४ डझन) : ३०-१००, संत्रा : (१० किलो) : १५०-५५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ६०-१३०, आरक्ता : २५-८०, गणेश : १०-३०, कलिंगड : ८-१०, खरबूज : १५-३०, पपई : १५-४०, चिकू (दहा किलो) : २००-६००, पेरू (२० किलो) : ४००-६००, अननस (१ डझन) : १००-६००, सीताफळ (१ किलो) : २०-१२०, पिअर (२४ ते २५ किलो) : ३५००-४०००.
----
फुलबाजार
पावसाची उघडीप आणि श्रावण महिन्यामुळे फुलांची मागणी वाढली आहे. उद्याच्या (ता. १७) पहिल्या श्रावणी सोमवारमुळे मागणी वाढल्याने फुलांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : ३००-४००, अॅस्टर : गड्डी २०-३०, सुटा : १००-१२०, शेवंती : ८०-१३०, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : ३०-४०, गुलछडी काडी : ३०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१३०, जरबेरा : ३०-५०, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी २५०-३५०, लिलीयम (१० काड्या) १०००-१२००, ऑर्चिड ४००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१२०, जिप्सोफिला : १५०-२५०, लीली बंडल : ८-१५, मोगरा : १०००-१२००, जुई : १०००-१२००.
--------
सोबत विविध फोटो
----
फोटो ओळी
पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. १६) झालेली पालेभाज्यांची आवक. मागणी वाढल्याने दर टिकून होते. (दुसऱ्या छायाचित्रात) गाजराची झालेली आवक. गाजराला २०० ते २५० रुपये प्रति दहा किलो दर मिळाला. (तिसऱ्या छायाचित्रात) ढोबळी मिरचीची झालेली आवक; प्रति दहा किलो १५० ते २०० रुपये दर मिळाला.
फोटो ओळ
पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. १६) भुईमूग शेंगांची झालेली आवक; प्रति दहा किलो ५०० ते ७०० रुपये दर मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.