more than 1000 destroyed at Fire In muktai land Loni kalbhor
more than 1000 destroyed at Fire In muktai land Loni kalbhor

वनवा पेटला; 1000 हून अधिक झाडे आगीत खाक

पारगाव (पुणे) : लोणी ता.आंबेगाव येथील लोणी वडगावपीर रस्त्यावरील मुक्ताई माळरानावरील गायरानात आग लागली होती.  अज्ञात समाज कंटकाने लावलेल्या आगीत तीन एकर क्षेत्रातील चिंच, कडुलिंब, शिसम, वड आदि प्रकारची सुमारे एक हजार लहान मोठी झाडे जळुन खाक झाली. सरपंच ऊर्मिला धुमाळ यांनी सहकार्यांबरोबर स्वत: जीव धोक्यात घालून आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याने सुमारे 250 च्या आसपास झाडे वाचवण्यात यश आले.

शनिवारवाड्याला नाव कसं मिळालं? पुण्याच्या ऐतिहासिक वास्तूविषयी सर्वकाही एका क्लिकवर! 

लोणी वडगावपीर रस्त्यावरील मुक्ताई गायरानातील तीन एकर क्षेत्रात ग्रामपंचायतीने विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपन केले होती त्यातील काही झाडे तीन वर्षाची तर काही दीड वर्षाची झाली होती. गायरानास आग लागलेली समजताच सरपंच ऊर्मिला धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत गायकवाड, वनकर्मचारी बाळासाहेब आदक, बाळासाहेब लंके, राजेंद्र खंडागळे व अंकूश लंके हे तर स्वःताचा पाण्याचा टॅक्ट्रर घेऊन घटनास्थळी धावले व आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सरपंच ऊर्मिला धुमाळ यांनी झाडांच्या फांद्या घेऊन आग शमविण्याचा आटोकाट प्रयत्न केला तोपर्यंत सुमारे एक हजाराच्या आसपास झाडे जळून खाक झाली होती. 

वाचा - Fastag Update: फास्टॅगचा पहिला दिवस; खेड-शिवापूर टोल नाक्यावर काय परिस्थिती?

''ज्या कोणी समाज कंटकाने ही आग लावली असेल. त्याचा वनखाते व पोलिस विभागाने शोध लावून संबंधीतावर कटक कारवाई करावी'' अशी मागणी ऊर्मिला धुमाळ यांनी केली आहे. 

हेही वाचा - पेट्रोलच्या शतकाला पाच रुपयांची कमी ; पुण्यात डिझेल ८४.६८ रुपये लिटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com