फिट इंडिया' मोहिमेत पुणे एनसीसीचा सहभाग; बाराहजाराहून अधिक एनसीसी कॅडेट्सचा सहभाग

fit-india-ncc
fit-india-ncc
Updated on

पुणे - 'फिट इंडिया' अंतर्गत शारीरिक क्रियाकलाप व खेळांना दैनंदिन जीवनात समाविष्ट करून निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) 2 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या कॅडेट्सने पुढाकार घेतला आहे. यासाठी 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरच्या कालावधीत ऑनलाईन जागरूकता मोहीम सुरू करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निरोगी भारतासाठी एक अनोखी आणि रोमांचक संधी म्हणून हे एनसीसी कॅडेट्स सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करत आहेत. ग्रुप कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये आणि 2 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅडेट्सनी 15 ऑगस्ट पासून ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे. यामध्ये शारीरिक सामर्थ्य वाढविणारे विविध बैठी खेळ व बाह्य क्रियाकलाप, योग, स्ट्रेचिंग आणि स्किपिंग व्यायाम, एरोबिक्स, जॉगिंग, सायकलिंग, पारंपारिक खेळ यांचा समावेश आहे. या एनसीसी कॅडेट्सने कॅडेट्सने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम यासारख्या समाज माध्यमांचा वापर करत त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना तंदुरुस्त व निरोगी रहाण्यासाठी जागरूकता केली. यामध्ये तब्बल बारा हजाराहून अधिक कॅडेट्सनी आणि तीन हजार 508 कुटुंबांनी फिटनेस कार्यात भाग घेतला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com