पुणेकरांच्या दिवसाची सुरुवात 'या' गोड बातमीने

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

गेल्या नऊ दिवसांच्या ट्रेंडच्या विश्लेषणावरून पुणेकरांसाठी ही चांगली बातमी पुढे आली आहे.

पुणे : पुणेकरांच्या आजच्या दिवसाची सुरवातच एका चांगल्या बातमीने झाली आहे. सलग सात दिवस कोरोनामुक्त झालेल्या 50 पेक्षा अधिक जणांना विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात 9 मार्चला राज्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचे निदान झाले. त्यानंतर सातत्याने कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत गेल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, गेल्या नऊ दिवसांच्या ट्रेंडच्या विश्लेषणावरून पुणेकरांसाठी ही चांगली बातमी पुढे आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सहलीसाठी दुबई येथे गेलेले दांपत्य आणि त्यांची मुलगी यांना सर्वप्रथम कोरोनाचे निदान झाले. चौदा दिवसांच्या उपचारानंतर त्यांना 25 मार्चला महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातून घरी सोडले. मात्र, एप्रिल अखेरपर्यंत बरे होऊन घरी जाणाऱ्यापेक्षा नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत होते. पुण्यात एक मेपासून सलग सात दिवस पन्नासहून अधिक कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात 25 मार्च ते 6 मे या 43 दिवसांमध्ये 587 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ऍक्टिव्ह केसेसचा ट्रेंड 

पुण्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याचे नवीन ट्रेंड आत दिसत आहे. पुण्यात 28 एप्रिलला एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1339 होती. त्यापैकी एक हजार 57 (79 टक्के) प्रत्यक्ष उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल होते.

हेच प्रमाण 65 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. म्हणजे, शहरातील एकूण रुग्णसंख्येचा आकडे दोन हजार 29 दिसत असला तरीही त्यापैकी एक हजार 324 रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे ऍक्टिव्ह केसेसचे प्रमाण 79 वरून 65 पर्यंत कमी आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than 50 peoples have discharged from Isolation Ward