

मोरगाव, ता. १९ : तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे अपघातांचे वाढते प्रमाण पाहता, महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे (१०८) कायमस्वरूपी रुग्णवाहिका स्टेशन सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी कदम- ढोले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना निवेदन दिले. मोरगाव परिसरातून मोरगाव- माळेगाव- नीरा आणि शिरूर-सातारा हे राज्य महामार्ग जातात. रस्ता रुंदीकरणानंतरही वाहनांच्या अतिवेगामुळे या भागात दरमहा १० ते १५ अपघात होत आहेत. सध्या बारामती येथून रुग्णवाहिका येण्यास ३५ ते ४५ मिनिटे लागतात. या विलंबामुळे अनेकदा अपघातग्रस्तांना वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागतात. तातडीच्या उपचारांसाठी मोरगावमध्ये रुग्णवाहिका केंद्र असणे अत्यावश्यक आहे. प्रशासनाने या वस्तुस्थितीची दखल घेऊन तातडीने रुग्णवाहिका स्टेशन मंजूर करावे, अशी मागणी कदम- ढोले यांनी निवेदनात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.