पुण्यातील 'या' कोविड केअर सेंटरमधील मृत्यूदर शून्य टक्के

संदीप जगदाळे
रविवार, 28 जून 2020

 महापालिका प्रशासनाकडे तोडकी यंत्रणा असली तरीदेखील योग्य मेहनत घेतली जात असल्याने कोंढवा येथील कोविड केअर सेंटर मधील सर्व रूग्ण ठणठणीत बरे होऊन घऱी जात आहेत. या सेंटरमधील मृत्यूदर शून्य असल्याची माहिती सेंटर प्रमुख डाॅ. दिप्ती बच्छाव व वैद्यकीय अधिकारी डाॅ. किरण लाटणे यांनी दिली.

हडपसर (पुणे) : महापालिका प्रशासनाकडे तोडकी यंत्रणा असली तरीदेखील योग्य मेहनत घेतली जात असल्याने कोंढवा येथील कोविड केअर सेंटर मधील सर्व रूग्ण ठणठणीत बरे होऊन घऱी जात आहेत. या सेंटरमधील मृत्यूदर शून्य असल्याची माहिती सेंटर प्रमुख डाॅ. दिप्ती बच्छाव व वैद्यकीय अधिकारी डाॅ. किरण लाटणे यांनी दिली.

 पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार...

या सेंटरमध्ये १८० रूग्ण उपचार घेत आहेत. रोज नव्याने कोरोना संसर्ग झालेले रूग्ण या केंद्रात दाखल होत आहेत. सेंटरमधील डॅाक्टरांसह सर्वच कर्मचारी रूग्णांची सेवा अंत्यत प्रामाणिकपणे करत आहेत. या सर्वांच्या टिम वर्कमुळेच या सेंटरमध्ये रूग्णांचा मृत्यू दर शून्य टक्के असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. तसेच सर्व स्टाफचे कौतुक केले. या सेंटरसाठी आवश्यक ती मदत तातडीने करण्यात येईल, हे महापौरांनी या सेंटरला भेट दिल्यानंतर नमूद केले.

  जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!

कोंढवा येथील सिंहगड महाविद्यालयाच्या वसतिगृहात हे सेंटर सुरू असून या ठिकाणी रूग्णांवर चांगल्या पध्दतीने उपचार केले जात आहेत. तसेच डॅाक्टरांपासून त्यांच्या हाताखाली काम करणारे प्रत्येक कर्मचारी रूग्णांना चांगली सेवा देत असल्याची प्रतिक्रीया रूग्णाचे नातेवाईक संजय लोमटे यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डाॅ. बच्छाव व डाॅ. लाटणे म्हणाले, एप्रिलच्या शेवटच्या आठवडयापासून सुरू झालेल्या या सेंटरमध्ये पुण्याच्या विविध भागातून कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेले रूग्ण रिपोर्ट येईपर्यंत ठेवले जात होते. पण गेल्या महिन्यापासून येथे १८० पॅाझिटीव्ह रूग्ण १० दिवसांच्या विलगीकरण कालावधीसाठी वास्तव्यास असतात. तसेच रिपोर्ट येणे बाकी असणारे ८० च्या वरती रूग्णही दोन दिवसांच्या कालावधीसाठी या सेंटरमध्ये वास्तव्यास असतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या सेंटरमध्ये आजपर्यंत २०९१ नागरिक कोरोना आजारासाठी विवीध ठिकाणाहून स्वॅब देऊन दाखल झाले होते. त्यापैकी १७५० संशयितांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. आजपर्यंत ३०० रूग्णांचे कोरोना रिपोर्ट पॅाझिटीव्ह आल्यानंतर १० दिवसाच्या सेंटरमधील उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज दिला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mortality rate at Kovid Care Center in Kondhwa is zero percent