

Pimpri
esakal
पिंपरी: मोशी कचरा डेपोतील दुर्घटना घडून शुक्रवारी सायंकाळी ५० तासांपेक्षा अधिक कालावधी उलटला. आठ कामगार इमारतीमध्ये अडकले आहेत. बचावासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे कुटुंबीय आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, मोकळ्या केलेल्या भागात अतिदाबामुळे कचरा इमारतीकडे सरकत आहे, पुन्हा तो बाजूला करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांना इमारतीमध्ये जाण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे सर्वच हतबल झाल्याचे चित्र शुक्रवारी (ता.१०) दुपारी दिसून आले.