

moshi garbage dump collapse ngt joint committee investigation nine deaths pimpri chinchwad municipal corporation solid waste management
पुणे : मोशी येथील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा ढिगारा कोसळून नऊ जणांचा मृत्यू झालेल्या दुर्घटनेची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) गंभीर दखल घेतली आहे. दुर्घटनेमागील पर्यावरणीय नियमांचे पालन, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी आणि संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तीन सदस्यीय संयुक्त समितीची नियुक्ती करण्यात आली असून, या समितीला एका महिन्याच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.