मोशी प्राधिकरणात जलतरण तलावाची मागणी

मोशी प्राधिकरणात जलतरण तलावाची मागणी
Published on

मोशी, ता. १२ : मोशी, चिखली व इंद्रायणीनगर परिसराचा तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने अत्यंत नियोजनबद्ध विकास करत विविध पेठांमध्ये आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र, मोशी आणि चिखलीत एकही अद्ययावत जलतरण तलाव नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मोशी प्राधिकरणात बास्केटबॉल, टेनिस, स्केटिंग, नेट क्रिकेट, जॉगिंग ट्रॅक यांसारख्या क्रीडा सुविधा आहेत. मात्र, जलतरण तलाव नसल्याने पोहण्याचा सराव किंवा व्यायामासाठी नागरिकांना भोसरी, चऱ्होली किंवा नेहरूनगर येथील जलतरण तलावांवर जावे लागते. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना लांबचा प्रवास करावा लागत असल्याने अनेकांना नियमित पोहण्याचा व्यायाम करता येत नाही. सध्या सुरू असलेल्या कडक उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक पोहण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे सध्याच्या जलतरण तलावांवर प्रचंड ताण निर्माण होत असून अनेक ठिकाणी सकाळ, दुपारी व सायंकाळच्या वेळेत मोठी गर्दी होत आहे.

खासगी प्रशिक्षण वर्ग
चऱ्होली येथील जलतरण तलावावर काही खासगी क्रीडा संस्थांनी पोहण्याच्या जादा बॅचेस सुरू केल्याने येथे सर्वसामान्य नागरिकांना पोहण्यास मनाई केली जात असल्याची तक्रार मोशी प्राधिकरणातून या जलतरण तलावावर पोहण्यासाठी गेलेल्या एका व्यायामप्रेमी तरुणाने केली.

मोशी, चिखली, डुडुळगाव परिसरातील मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण आणि नागरिकांना आरोग्यदायी व्यायामासाठी स्थानिक स्तरावर सुविधा मिळणे गरजेचे आहे.
- गोरक्षनाथ जाधव, माजी सैनिक, जलतरण प्रेमी

मोकळा भूखंड पडून
मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक चार मधील लोंढे उद्यानाशेजारी प्राधिकरणाचा एक भूखंड मोकळा पडून आहे. सध्या त्यात मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढलेली आहेत. या भूखंडावर जर अद्ययावत असा जलतरण तलाव उभारण्यात आला, तर उद्यान आणि जलतरण तलाव या दोन्हींचा एकत्रित असा उपयोग नागरिकांना होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Moshi Tragedy: Executive Engineer Accused of Misleading Officials Over Illegal Building
30 English Keywords
Moshi garbage dump collapse family tragedy
Akshay Sawant garbage accident
Rescue teams clearing debris after a massive garbage heap collapsed 
Marathi News Esakal
www.esakal.com