देशात पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक ऍक्‍टिव्ह रुग्ण; बरे होण्याचेही प्रमाणही चांगलेच  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

देशातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा एक कोटीवर गेला आहे. रविवारी दुपारी दोन वाजता देशात एक कोटी एक लाख 88 हजार 879 कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यात झाली.

देशात पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक ऍक्‍टिव्ह रुग्ण; बरे होण्याचेही प्रमाणही चांगलेच 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - देशात कोरोनाचे सर्वाधिक ऍक्‍टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने रविवारी प्रसिद्ध केली. देशातील 5.3 टक्के रुग्ण सध्या या जिल्ह्यात असले तरीही सर्वाधिक बरे होणारे रुग्णही येथेच असल्याचेही स्पष्ट केले आहे. 

देशातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा एक कोटीवर गेला आहे. रविवारी दुपारी दोन वाजता देशात एक कोटी एक लाख 88 हजार 879 कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यात झाली. त्यापैकी 18.8 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील होते. सध्या देशभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन लाख 77 हजार 45 रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यापैकी 21 टक्के म्हणजे 58 हजार 91 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्यातही सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 14 हजार 558 (5.3 टक्के) असल्याचेही माहिती केंद्रीय आरोग्य खात्याकडून देण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डबलिंग रेट चार महिन्यांवर 
पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकाच्या सुरवातीला जेमतेम एक आठवड्यात रुग्णांची संख्या दुपटीने वाढत होती. ती आता चार महिन्यांपर्यंत वाढली असल्याची माहिती पुण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्यात आतापर्यंत एक कोटी 24 लाख 51 हजार 919 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यांचे घशातील द्रव पदार्थांची तपासणी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर पद्धतीने केली आहे. त्यापैकी 15.4 टक्के (19 लाख 16 हजार 236) रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान झाले. उर्वरित 84. 6 टक्के रुग्णांना कोरोना नसल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालावरून स्पष्ट दिसते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या नियंत्रित आहे, ही दिलासादायक परिस्थिती सध्या दिसत आहे. आता इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला विषाणूंचा फैलाव राज्यात होणार नाही, याची काटेकोरपणे खबरदारी घेतली जात आहे. त्याबाबतचा सर्वेलन्स सुरू आहे. 
- डॉ. सुभाष साळुंके, माजी महासंचालक आणि कोरोना उद्रेकाबाबतचे तांत्रिक सल्लागार 

loading image
go to top