Cherry Rate : आंबट-गोड चेरीला ग्राहकांची पसंती

मार्केट यार्डात एक किलो वजनाच्या दररोज ४ ते ५ हजार बॉक्सची आवक होत आहे. दिल्लीत निवडणुकीमुळे दोन दिवस बाजार बंद होता
Cherry Rate
Cherry RateSakal

मार्केट यार्ड : पावसाळा सुरू होण्याआधीच बाजारात लाल गुलाबी रंगाच्या, आकाराने लहान, चवीला आंबट-गोड आणि लक्ष वेधून घेणाऱ्या आकर्षक चेरीच्या फळाचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारात हिमाचल प्रदेश आणि काश्मीर येथून गुलटेकडीच्या मार्केट यार्डात दररोज आवक सुरू आहे. ग्राहकांकडून चेरीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आवक जास्त असल्याने भाव कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मार्केट यार्डात एक किलो वजनाच्या दररोज ४ ते ५ हजार बॉक्सची आवक होत आहे. दिल्लीत निवडणुकीमुळे दोन दिवस बाजार बंद होता, तसेच हैदराबाद येथे पाऊस झाला आहे आणि कोलकाता येथे वादळ आल्याने पुणे आणि मुंबई येथे मालाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी सुयोग झेंडे यांनी दिली.

चेरीचे पीक थंड हवामानाच्या प्रदेशात घेतले जाते. यंदा चेरीचे उत्पादन चांगले आहे. पावसाचा फटका बसला नसल्याने उपलब्ध पिकाचा दर्जा चांगला आहे. इतर ठिकाणच्या बाजारांच्या तुलनेत पुण्यात चेरीला चांगला दर मिळतो.

त्यामुळे काश्मीरच्या शेतकऱ्यांना पुण्याची बाजारपेठ महत्त्वाची वाटते. हंगाम दोन महिन्यांपर्यंत सुरू राहील आणि आवकही चांगली होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात चेरीला घरगुती ग्राहक आणि स्टॉलविक्रेते यांच्याकडून चांगली मागणी आहे.

चेरीचे भाव आणि वाहतूक खर्च

विमानाने येणारी चेरी - ३०० ते ३५०

एक किलो बॉक्स - ८० ते ८५ वाहतूक खर्च

वाहनातून येणारी चेरी - २०० ते २५०

एक किलो बॉक्स - २० ते २५ रुपये वाहतूक खर्च

येथे घेतले जाते उत्पन्न

काश्मीरमधील गांदरबल, बारामुल्ला, श्रीनगर, शोपियान आणि तंगमार्ग येथे, तसेच हिमाचल प्रदेशातील शिमला, कुलू, मंडी, चंबा, लाहौल-स्पीटी, किन्नौर येथे चेरीचे उत्पादन होते. एकूण उत्पादनापैकी ९० टक्के उत्पादन एकट्या सिमला जिल्ह्यात होते. शिमला येथील नरकंडा, कोटगढ, थानाधार, कुमारसैन आणि बागी हे चेरी उत्पादनात आघाडीवर आहेत.

रेड ब्यूटी चेरी आणि ब्लॅक बेरी चेरी बाजारात येत आहेत. या दोन्ही प्रकारच्या चेरीला मागणी चांगली आहे. बाजारात हवाईमार्गे त्याच दिवशी, तर रस्त्यावरून वाहनाद्वारे तिसऱ्या दिवशी चेरी बाजारात दाखल होते. यंदा उत्पादन चांगले असून आवक जास्त आहे.

- सुयोग झेंडे, व्यापारी, मार्केट यार्ड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com