Vidhan Sabha 2019 : पुणे: भाजपमध्ये सर्वाधिक इच्छुक 'या' मतदारसंघात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

विधानसभा 2019 
पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या शहरातील इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी  (ता. २९)  होणार आहेत. पक्षाचे नेते आणि शिक्षणमंत्री आशिष शेलार इच्छुकांशी संवाद साधणार आहेत. यानिमित्ताने विद्यमान आमदारांना आव्हान देणाऱ्या इच्छुकांची नावे समोर येणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये याबाबत कुतूहल आहे. 

शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत. मात्र त्यातील पाच आमदारांच्या जागेवर नवे चेहरे दिले जातील, अशी कार्यकर्त्यांत चर्चा आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. अनेक नगरसेवक, पदाधिकारीही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. भाजपने यंदा इच्छुकांकडून थेट अर्ज मागविलेले नाहीत, तर संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षांमार्फत इच्छुकांना मुलाखतीस येण्याचे निरोप दिले आहेत. तसेच त्या-त्या मतदारसंघातील इच्छुकांची नावे संकलित करून पक्षापर्यंत पोचविण्याचीही जबाबदारी संबंधित अध्यक्षांकडे सोपविण्यात आली आहेत. शेलार गुरुवारी जंगली महाराज रस्त्यावरील पक्षाच्या कार्यालयात येणार आहेत. एका दिवसांत आठही मतदारसंघातील इच्छुकांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर त्या नावांची यादी प्रदेशाध्यक्षांकडे जाईल, अशी माहिती शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी दिली.

सर्वाधिक इच्छुक कसब्यात! 
गिरीश बापट यांची खासदारपदी निवड झाली आहे. त्यामुळे कसब्यात नवा उमेदवार येणार, हे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात सुमारे १५ जण इच्छुक आहेत. त्या खालोखाल शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची संख्या जास्त आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most interested in Kasaba constituency in BJP