मायलेकी खरेदी करुन निघाल्या अन् दुचाकीने उडविले

accident_86_29.jpg
accident_86_29.jpg
Updated on

पुणे : खरेदी करुन रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीने मायलेकींना उडविले. या अपघातात आईसह दोन्ही मुली जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शनिवारी दुपारी चार वाजता कोथरुड येथील पौड रस्त्यावर घडली. 

याप्रकरणी सोनल मनेर (वय 38, रा. पाषाण) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणेर या त्यांच्या दोन मुली मेहक (वय 10) व मायरा (वय 6) यांच्यासह शनिवारी पौड रस्त्यावरील एका दुकानामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. कपडे खरेदी केल्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्या दोन्ही मुलींसमवेत दुर्गा कॅफेसमोरील रस्ता ओलांडून पलिकडे लावलेल्या त्यांच्या गाडीकडे जात होत्या. तेवढ्यात आनंदनगरच्या दिशेने आलेल्या भरधाव दुचाकीस्वाराने तिघींना उडविले. मेहक व मायरा या दोन्ही मुलींसह मनेर यांच्या डोक्‍याला, खांद्याला जबर मार बसला. या
घटनेनंतर नागरिकांनी तिघींनाही उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात नेले.

दरम्यान, अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही चित्रीकरणावरुन त्याचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस कर्मचारी राजेंद्र चव्हाण करत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Attempt to Murder in Pune Two Brothers Attacked Over Old Rivalry While Heading to Funeral Accused Absconding
Pune Infrastructure Update CM Pushes HCMTR Ring Road and Patal Lok Tunnel Projects for Faster Completion
What is Agristack registration for farmers?
Pawna Dam Water Level Rises to 96 Percent Andra Dam Full Heavy Rain Impacts Pimpri and Nearby Villages
Marathi News Esakal
www.esakal.com