esakal | Coronavirus : आईला कोरोना; पण नवजात अर्भक ठणठणीत
sakal

बोलून बातमी शोधा

Bornbaby

कोरोनाच्या संसर्गाची स्पष्ट लक्षणे दिसणाऱ्या गर्भवतीला प्रसव वेदना सुरू झाल्या. त्यांचा स्वॅब घेऊन, तो तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. प्रसूती होईपर्यंत गर्भवतीला कोरोना झाल्याचे निदान झाले नव्हते. पण, कोरोनाची लक्षणे असल्याने संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट (पीपीई) घालून, ससून रुग्णालयातील डॉक्‍टरांनी प्रसूती केली.

Coronavirus : आईला कोरोना; पण नवजात अर्भक ठणठणीत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलेची पुण्यातील पहिली यशस्वी प्रसूती ससून रुग्णालयात झाली. आईला कोरोना झाला असला तरीही नवजात अर्भकाला त्याचा संसर्ग झाला नसल्याचे दिसून आले आहे. 

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या संसर्गाची स्पष्ट लक्षणे दिसणाऱ्या गर्भवतीला प्रसव वेदना सुरू झाल्या. त्यांचा स्वॅब घेऊन, तो तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. प्रसूती होईपर्यंत गर्भवतीला कोरोना झाल्याचे निदान झाले नव्हते. पण, कोरोनाची लक्षणे असल्याने संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट (पीपीई) घालून, ससून रुग्णालयातील डॉक्‍टरांनी प्रसूती केली. ही प्रसूती यशस्वी झाली असून, साडेतीन किलो वजनाच्या बाळाला तिने जन्म दिला. नवजात अर्भकाला कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे आतापर्यंत दिसत असल्याचेही डॉक्‍टरांनी सांगितले. 

या नवजात अर्भकाला स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. डॉक्‍टर आणि परिचारिका त्याची काळजी घेत आहेत, असेही रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

loading image
go to top