

Sassoon Hospital
Sakal
पुणे : शहरातील नामांकित महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या व गरीब कुटुंबातील २२ वर्षाच्या तेजस (नाव बदललेले) च्या दोन वर्षांपूर्वी उच्च रक्तदाबामुळे त्याचे दोन्ही मूत्रपिंड (किडन्या) निकामी झाल्या. तेव्हापासून डायलिसिस मागे लागले. डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाची पर्याय सुचवला. खासगी रुग्णालयातील १० ते १५ लाखांचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांनी ससूनमध्ये चौकशी केली. अन् ससूनमध्ये नाममात्र खर्चात त्याचे प्रत्यारोपण झाले. त्याला आईने मूत्रपिंड दान केले.