आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

बारामती येथील सव्वा महिन्यांच्या बाळाच्या खूनाप्रकरणी आज या बाळाची आई दिपाली संजय झगडे हिच्यावर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील चंदननगर भागात राहणा-या दिपाली संजय झगडे हिला दोन मुलींवर तिसरीही मुलगी झाल्याने दिपाली निराशेमध्ये होती.

आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी

बारामती - येथील सव्वा महिन्यांच्या बाळाच्या खूनाप्रकरणी आज या बाळाची आई दिपाली संजय झगडे हिच्यावर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील चंदननगर भागात राहणा-या दिपाली संजय झगडे हिला दोन मुलींवर तिसरीही मुलगी झाल्याने दिपाली निराशेमध्ये होती. आपले बाळ कुणीतरी पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याचा देखावा तिने उभा केला होता. त्याच वेळेस पोलिसांच्या तपासाची सुई तिच्यावरच होती. इतक्या लहान बाळाला आईपासून कोण नेणार हा प्रश्न पोलिसांपुढेही होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपण झोपलो असताना आपली सव्वा महिन्यांची मुलगी गायब झाल्याचा बनाव तिने केला होता. त्या नंतर काही वेळातच ही मुलगी घराजवळच्याच एका पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढऴून आली होती. पोलिसांच्या अनुभवी नजरेने हे कृत्य घरातीलच कुणीतरी केल्याचे हेरले होते. मुलीच्या मृत्यूनंतर रुग्णालयात दाखल असलेल्या दिपाली हिच्याकडे पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर तिने आपणच हे कृत्य केल्याची कबूली दिली. 

बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार

घराण्याला वंशाचा दिवा हवा या हव्यासापोटी आपण हे कृत्य केल्याचे तिने पोलिस तपासात कबूल केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. बारामती तालुक्यात  सव्वा महिन्याच्या बालिकेचा खून झाल्यानंतर खऴबळ माजली होती. मात्र अखेर मातेनेच मुलाच्या हव्यासापोटी आपल्या मुलीचा बळी दिल्याची बाब आज समोर आली.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top