१८ला मातृशक्ती स्मृती संदेश यात्रा

१८ला मातृशक्ती स्मृती संदेश यात्रा
Published on: 

साताऱ्यात रविवारी मातृशक्ती स्मृती संदेश यात्रा

सातारा, ता. १५ ः आचार्य विनोबा भावे यांच्या मातोश्री रुक्मिणी माता यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि गांधी-विनोबा यांच्या विचारांच्या प्रसारासाठी ‘मातृशक्ती स्मृती संदेश यात्रा’ जमखंडी या रुक्मिणी मातेच्या जन्मगावापासून धुळे येथे जाण्यासाठी निघाली आहे. आचार्य विनोबा भावे यांचे शिष्य रमेशभैया आणि विमलताई मुंडे यांच्यासह कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले आहेत. ही यात्रा रविवारी (ता. १८) साताऱ्यात येणार आहे. यात्रेतील मान्यवर दिवसभर विविध ठिकाणी विद्यार्थिनी, युवक आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
यात्रेचे साताऱ्यात आगमन झाल्यानंतर सकाळी शासकीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कार्यक्रम, दुपारी कर्मवीर विद्यापीठात रमेशभैया विद्यार्थिनींशी संवाद साधतील. या संवादातून गांधी-विनोबा विचार, मातृशक्तीचे महत्त्व, अहिंसा, सत्याग्रह आणि सामाजिक परिवर्तन याविषयी विचारांची देवाणघेवाण होईल. सायंकाळी साडेसहा वाजता मुक्तांगण येथे प्रा. संजीव बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान होईल.
त्यानंतर यात्रा वाईच्या दिशेने प्रस्थान करेल. शनिवारी (ता. १९) सकाळी ११ वाजता पाचवड येथील तिरंगा हायस्कूलमध्ये कार्यक्रम, दुपारी १२ वाजता किसन वीर महाविद्यालयात रमेशभैया युवकांशी संवाद साधतील. ज्ञानदीप हायस्कूलमधील कार्यक्रमानंतर यात्रा पुण्याकडे रवाना होईल.

----------------------------------पूर्ण----------------------------

मातृशक्ती स्मृती संदेश यात्रेचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत होत आहे. केवळ स्मरण आणि अभिवादनापुरती मर्यादित न राहता मातृशक्तीचे योगदान, गांधी-विनोबा यांचे जीवनमूल्य, अहिंसक संघर्ष, सत्याग्रह, सामाजिक समता आणि परिवर्तनशील विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या यात्रेचा महत्त्वाचा उद्देश आहे.

आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत अहिंसक, सत्याग्रही आणि विधायक परिवर्तनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अशा यात्रांमधून नवी प्रेरणा व ऊर्जा मिळत आहे. विद्यार्थिनी आणि युवकांशी होणारा संवाद हा या विचारांचा वारसा पुढील पिढीकडे सुपूर्द करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या यात्रेच्या माध्यमातून रुक्मिणी मातेच्या स्मृतींना अभिवादन करतानाच गांधीवादी आणि सर्वोदय विचारांच्या प्रसारासाठी समाजातील विविध घटकांनी एकत्र यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
----------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com