Video : गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने टोळक्याची आई आणि मुलाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळक्याने आई आणि मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली.

पुणे : गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळक्याने आई आणि मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सागर घडसिंगसह दहा जणांविरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड परिसरात गुंडाची दहशत वाढत चालली आहे. गणेशोत्सवाची वर्गणी का दिली नाही असं म्हणत 10 जणांच्या टोळक्याने आई आणि मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. वाकड परिसरातील ओम साई मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली असून त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत आई आणि मुलगा जखमी झाला आहे. रमेश देवराम चौधरी यांनी वाकड पोलिसात फिर्याद नोंदवली आहे. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहे. आरोपीला अटक व्हावी म्हणून काल मोर्चा ही काढण्यात आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother, son beaten up for not paying Ganesha Festival subscription in pimpri