मुलीच्या उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या मातेवरच काळाचा घाला

हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन
मीराबाई रामभाऊ लोंढे
मीराबाई रामभाऊ लोंढे sakal

वाकड: गरोदर मातेची नोंद व अन्यप्राथमिक उपचारासाठी मुलीला महापालिकेच्या रुग्णालयात घेऊन गेलेल्या मातेवरच काळाने घाला घातला. आईला वाचविण्यासाठी इतरांकडे मदतीची याचना करण्याची वेळ गर्भवती मुलीवर आली. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना मंगळवारी (ता. १५) दुपारी एकच्या सुमारास थेरगाव येथे घडली.

मीराबाई रामभाऊ लोंढे
अमोल कोल्हेंनी शब्द पाळला... बैलगाडा शर्यतीच्या घाटात घोडीवर मांड!

मीराबाई रामभाऊ लोंढे (वय. ४०, रा. काळाखडक, वाकड) असे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेल्या दुर्दैवी मातेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, मीराबाई ह्या मुलगी अंकिताला घेऊन गरोदर मातेची नोंदणी करण्यासाठी थेरगाव रुग्णालयात आल्या होत्या दरम्यान केस पेपर काढताना त्या अचानक खाली कोसळल्या हा प्रकार पाहून भांबावलेल्या अंकिताने मदतीसाठी हंबरडा फोडला तेव्हा सुरक्षारक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना अतिदक्षता विभागात हलविले मात्र थोड्याच वेळात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मीराबाई रामभाऊ लोंढे
अपंगत्व येऊनही रामदास भोगाडे यांचा देशसेवेचा ध्यास कायम

भाजीचा व्यवसाय करणाऱ्या मीरा लोंढे ह्या कुटुंबाचा एकमेव आधार होत्या. १० वर्षांपूर्वी पतीने अपघातात एक पाय गमाविल्याने अतिशय हलाकीत व गरिबीत त्या कुटुंबाचा आधारवड बनल्या. पुरुषांच्या बरोबरीने त्या मेहनत करून कुटुंबाचाउदर निर्वाह करीत. त्यांच्या सारख्या धडपडी महिलेच्या निधनाने लोंढे कुटुंबीय उघड्यावर आले असून परिसरत हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव व सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई जाधव यांनी या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.

अंगावर काढल्याने जीव गेला

लोंढे चक्कर येऊन पडताच त्यांना तात्काळ आहे त्या बेडसह अतिदक्षता विभागात हलविले. त्यांना आदल्या दिवसापासूनच त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी अंगावर काढले होते. अत्यावश्यक उपचारांसहलोडिंग डोस देण्यात आले मोठा अटॅक असल्यानेसर्व प्रयत्न करूनही त्या वाचू शकल्या नाहीत.

डॉ. अभयचंद्र दादेवार

प्रभारी वैद्यकीय अधिकारी, थेरगाव रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com