kidney transplant mother to son
sakal
पुणे - शहरातील नामांकित महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या व गरीब कुटुंबातील २२ वर्षांच्या तेजसचे (नाव बदललेले) दोन वर्षांपूर्वी उच्च रक्तदाबामुळे दोन्ही मूत्रपिंड (किडन्या) निकामी झाले होते.
तेव्हापासून त्याला डायलिसिस करावे लागत होते. डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा पर्याय सुचवला. खासगी रुग्णालयातील १० ते १५ लाखांचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांनी ससूनमध्ये चौकशी केली. त्याला आईने मूत्रपिंड दान केले अन् ससूनमध्ये नाममात्र खर्चात त्याचे प्रत्यारोपण झाले.