रॉंग साईडने येणाऱ्या चारचाकीची मोटरसायकलच्या धडकेत युवकाचा मृत्यू

रॉंग साईडने येणाऱ्या चारचाकीची मोटरसायकलच्या धडकेत युवकाचा मृत्यू

Published on

चारचाकी-दुचाकीच्या
धडकेत युवकाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. १ : विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास लोटेवाडी येथील लोटेवाडी- सोनलवाडी रस्त्यावर (फॉरेस्ट परिसर, ता. सांगोला) घडली. दाजी सुखदेव गडदे (वय ३४, रा. सावे, ता. सांगोला) असे मृत युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडदे हे दुचाकी (एमएच ४५- एडब्ल्यू १६३२) घेऊन जात असताना समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने (एमएच १३- एझेड ८९७३) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात गडदे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादी बंडू दगडू गडदे (वय ४५, रा. सावे, ता. सांगोला) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चारचाकी वाहनाचा चालक सादिक करीम शेख (वय ३८, रा. उमरगा, ता. उमरगा, जि. धाराशिव) याच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची नोंद २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता करण्यात आली. पुढील तपास पोलिस हवालदार घोंगडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com