दुचाकीवर घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
दुचाकी घसरून पडल्याने
शिरभावीतील तरुणाचा मृत्यू
सांगोला पोलिसांत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. ३ : शिरभावी ते सांगोला मार्गावरील बुरांडेनगर परिसरात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात पाठीमागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १) सकाळी दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी चालकाविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात २ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय बबन भोसले (वय २३, रा. धायटी, ता. सांगोला) हा त्याची दुचाकी (एमएच ४५ बीसी ५५२६) चालवत होता. त्याच्यासोबत मागे घनश्याम पांडुरंग नागरगोजे (वय २८, रा. शिरभावी, ता. सांगोला) बसले होते. सांगोल्याकडे जात असताना बुरांडेनगर येथे दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात घनश्याम नागरगोजे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच वाहनाचे सुमारे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी सोमनाथ पांडुरंग नागरगोजे (वय ३०, रा. शिरभावी, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली असून, संशयित आरोपी चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार घोंगडे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

