मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांना बेड्या

मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांना बेड्या
Published on

राजगुरुनगर, ता. १८ : खेड पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चार चोरीच्या गुन्ह्यातील पाच मोटारसायकल जप्त केल्या, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिली.
अविनाश कृष्णा विटेकर (वय २०, रा. चव्हाणमळा, ता. खेड) आणि प्रिन्स जयप्रकाश बेंद्रे ( वय २०, रा. राक्षेवाडी, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. राक्षेवाडी ( ता. खेड ) येथील आनंदनगर भागातील गुरुराज रेसिडेन्सी या इमारतीच्या पार्किंगमधून शुक्रवारी (ता. १४) दिवसा एका कामगाराची मोटारसायकल चोरीला गेली. त्यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकातील फौजदार महेश गरड, पोलिस हवालदार संतोष मोरे, विलास साबळे, संदीप लांडे, मुकुंद कुडेकर, महेश गोसावी, प्रवीण आढारी, सूरज राक्षे व गोकूळ कोळी हे करत होते. त्यांनी या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तसेच त्यांना खबऱ्याकडून दोन सराईत चोरांची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून त्या दोन चोरांना ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com